पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, सोलापूर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.


briefcase

सर्व पुस्तके प्रियकरांचा स्वागत ...


दिनाक १८/४/१९७३ या दिवशी मा. श्री. कृ. द. पुराणिक (ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते वाचनालय उघडण्यात आले. पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय वाचकांसाठी वाचनालयात प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र असे कक्ष केले. जसे मुक्तव्दार विभाग, महिला विभाग, बाल विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग. मुक्तव्दार दालनांत कथा, कादंबरी, काव्य, प्रवास वर्णन, धार्मिक ग्रंथ, महिला व बालकांसाठी आणि आत्मचरित्राची पुस्तके असे विविध ग्रंथ संपदा आहे. गेली चाळीस वर्ष बहुभाषिक वाचकांसाठी वाचानसेवा देणाऱ्या पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय तर्फे मोफत संगणक साक्षर अभियान उपक्रम सुरु केला आहे. पुढे वाचा


पूर्व विभागातील वाचकांच्या मागणीनुसार उद्योग बँकेचे तत्कालिन चेअरमन कै. राजारामपंत कुचन ह्यांनी समाजातील काही ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेऊन त्यातप्रामुख्याने पूर्व विभागात विणकर कामगार वर्ग व तेलुगू भाषिक असून ते १०० वर्षापूर्वी आंध्रातून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले असल्याने अधिक शिक्षण व पैसे खर्च करुन वर्तमानपत्र घेऊन वाचण्याची सवय नव्हती अशांना देशातील व परदेशातील दैनंदिन घडामोडी व ज्ञान सामान्यांना मिळण्यासाठी एक मोफत वाचनालय काढण्यात यावे असे ठरवून पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय म्हणून दि ८/४/१९७४ रोजी उद्यास आले. पुढे वाचा


पुस्तक संग्रह


१९७५ पासून वाचनालय पुस्तक संग्रह करणास सुरुवात केली. मराठी, तेलुगु, इंग्रजी, हिंदी भाषां मध्ये विविध पुस्तके उपलब्ध आहेत, वाचकांसाठी मुक्तव्दार दालनांत २५ दैनिके, २० साप्ताहिके, १५ पाक्षिके, ६५ मासिके व २५९३४ ग्रंथ (कथा, कादंबरी, काव्य, प्रवास वर्णन, धार्मिक ग्रंथ, महिला व बालकांसाठी आणि आत्मचरित्राची पुस्तके).असे विविध ग्रंथ संपदा आहे. पुस्तके देणगी आणि खरेदी करून संग्रह केलेले आहे. पुढे वाचाजिल्हा पातळीवर कार्यशाळा

राजा राममोहन रॉय पुस्तकालय प्रतिष्ठान कोलकत्ता व पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विधमाने रविवार दि. ८ मे २०११ रोजी वाचनालयाच्या विणकर सभागृह एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्याक्षस्थान श्री. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष श्री. डॉ. विजयकुमार आरकाल यांनी भूषविले. डॉ. सौ. श्रुती, श्री. वडगबाळकर - प्राचार्य ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर यांच्या शुभहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

पुढे वाचा

वैशिष्टे

 • शासनमान्य - “अ” दर्जा
 • संगणकीय ग्रंथालय
 • ३६५ दिवस चालू
 • प्रत्येक विभाग स्वतंत्र
 • वाचन विभाग
 • २४ तास शुध्द पाणी
पुढे वाचा

बातम्या आणि उपक्रम


विविध उपक्रमांचे छायाचित्रे

सहभागी व्हा

 • पुस्तक सभासद @ २६५
 • मासिक सभासद @ २७०
 • स्पर्धा परीक्षा सभासद @ २७५
 • महिला विभाग सभासद @ २६५
 • बाल विभाग सभासद @ ४०
पुढे वाचा

संपर्क

पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय,सोलापूर

पत्ता : १५१/५, रविवार पेठ, कन्ना चौक,

सोलापूर - ४१३००५.

फोन : (०२१७) २७२२४७८.

इ-मेल : purvavibhagvachanalaya@gmail.com